बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

तुमच्या फोनच्या कॉल आणि डायलरची सेटिंग अचानक बदलली? जाणून घ्या काय आहे कारण

तुमच्या फोनमधील कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलल्या आहेत का? जर होय, तर तुम्ही एकटे नाही आहात. बहुतेक अँड्रॉइड युजर्सच्या फोनमध्ये हा बदल झाला आहे. कॉलिंग इंटरफेसमध्ये झालेल्या या बदलामागचं कारण लोक जाणून घ्यायला उत्सुक आहेत. याबद्दल सोशल मीडियावरही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चला तर जाणून घेऊ या यामागचं खरं कारण काय आहे.

LOHAGAD BOATING CLUB & RESTAURANTS

Dialer Screen Change Reason: तुम्ही अँड्रॉइड युझर असाल तर कदाचित तुमच्या फोनमधील कॉल आणि डायलर सेटिंग्समध्ये अचानक बदल झाला असेल. कोणताही अपडेट किंवा अलर्ट न देता झालेल्या या बदलामुळे लोक चिंतेत आहेत. सोशल मीडियावर अनेक जण या बदलाबद्दल विचारत आहेत. मात्र बहुतेक लोकांना यामागचं कारण माहिती नाही. फोनमध्ये झालेल्या या बदलामुळे अनेक अँड्रॉइड युजर्स चकित झाले आहेत. जर तुमच्या फोनमध्येही हा बदल झाला असेल तर चला जाणून घेऊ या त्याचं कारण आणि ते कसं हटवायचं.

फोनकॉल डायलर सेटिंग चेंज

हा बदल फक्त त्याच स्मार्टफोन्समध्ये झाला आहे ज्यामध्ये Google Phone App डायलर अ‍ॅप म्हणून सेट आहे. Google ने आपल्या Phone अ‍ॅपमध्ये Material 3 Expressive Redesign लागू केलं आहे, जे आता युजर्सपर्यंत पोहोचायला लागलं आहे. हा नवीन डिझाइन खास करून अधिक मॉडर्न, सिंपल आणि युजर-फ्रेंडली करण्यासाठी आणला गेला आहे. यात सर्वात मोठा बदल अ‍ॅपच्या नेव्हिगेशन स्टाइलमध्ये पाहायला मिळतो.

Share it :