गणेश विसर्जन : पुण्यातील गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील वाद आज महत्त्वाची बैठक पार पडत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हा वाद मिटणार का? असा सवाल विचारला जात आहे.


Pune News : पुण्यातील लांबलचक गणपती विसर्जन मिरवणुकीवरून पेटलेला वाद आता मिटण्याची शक्यता आहे. आम्हाला 36 तासहून अधिक वेळ रांगेत थांबावं लागतं, असं म्हणत पुण्यातील अनेक मंडळांनी मानाच्या पाच गणपतींच्या मिरवणुकीच्या आधी आपली मिरवणूक काढून गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मोठा वाद पेटला. मानाच्या गणपतीआधी विसर्जन करणं योग्य नसल्याने आता पुण्यातील मंडळांच्या वर्तुळात नाराजीचं वातावरण असल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता काल पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वाची बैठक घेतली तर आज केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ बैठक घेणार आहेत.

मुरलीधर मोहोळ बैठक घेणार
मध्यवर्ती भागातील आणि विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्ता केळकर रस्ता, टिळक रस्तावरून सहभागी होणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासदार मुरलीधर मोहोळ बैठक घेणार आहेत. मानाच्या पाच आणि तीन गणेश मंडळ विरुद्ध इतर गणेश मंडळ असा एक वेगळा वाद सध्या सुरू आहे. विसर्जन मिरवणूक लवकर निघावी ही मागणी गणेश मंडळाची आहे.