बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

मोठी बातमी! पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या घर, कार्यालयांवर आयकर विभागाचा छापा

पुणे: पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवहायिकांच्या कार्यालयांसह त्यांच्या घरी आयकर विभागाने अचानक छापा (Income Tax Raid) टाकत कारवाई करण्यात आली आहे.

पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवहायिकांच्या कार्यालयांसह त्यांच्या घरी आयकर विभागाने अचानक छापा (Income Tax Raid) टाकत कारवाई करण्यात आली आहे. यात कोहिनर गृपचे (Kohinoor Group) प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या सेनापती बापट रसत्यावरील आयसीसी टॉवर मधील कार्यालयात आणि सिंध सोसायटी मधील घरी छापा (Pune crime) टाकण्यात आला आहे. तर मित्तल गृपच्या (MittalGroup) बंडगार्डन (Bund Garden) भागातील कार्यालयावर देखील छापा टाकण्यात आलाय. सध्या या कारवाई मागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, मात्र या धडक कारवाईने अनेक चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान, तपासाअंती या कारवाईचे सत्य कळू शकणार आहे.

विशेष म्हणजे, मुंबईतील ऑनेस्ट शेल्टर्स एलएलपी प्रकल्पासंदर्भात ईडीने मित्तल ब्रदर्स ग्रुपची यापूर्वी चौकशी केली आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी अर्थात महारेराच्या निर्देशानंतर ही अलीकडील कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये वरळी येथील पॅलेस रॉयल प्रकल्पाचे प्रवर्तक असलेल्या ऑनेस्ट शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून सुमारे 90 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते. फ्लॅट्सचा विलंबित ताबा देण्याबाबतच्या पूर्वीच्या निर्देशांचे पालन करण्यात कंपनीने अपयशी ठरल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला होता.

Share it :