*पवनाधरण १००% भरले.संध्याकाळी ०६:०० च्या आकडेवारी नुसार..
*पवनाधरणातील विसर्ग वाढविला
*पवनानदी पात्रात विसर्ग सुरु
*मावळ तालुक्यात सर्वदूर मुसळधार ते अति मुसळधार पाऊस सुरू आहे. मावळ तालुक्यातील पवनानदी पात्रात रात्री ०९:०० च्या सुमारास १५७७० क्युसेक ने विसर्ग सुरु करण्यात आला आहे.नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबावे.पवनानदी काठच्या गावातील अनेक घरांमध्ये पाणी आले आहे.पवनमावळ भागातील महत्त्वाचा पुल कोथुर्णे,ब्राम्हणोली पाण्याखाली गेले आहे.

पवना पाटबंधारे विभागाचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी नाही. पंरतु लोणावळा ग्रामीण पोलीस उपस्थितीत आहे. सदर नियोजनातील पवना पाटबंधारे विभागाचे शाखाअभियंता रजणिस बारिया हे कोणत्याही प्रकारची जबाबदारी न स्वीकारता ते वैयक्तिक कामामध्ये व्यस्त असल्याचे समजले आहे. नागरिकांचा जिव धोक्यात आला आहे. उपाययोजना करण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे..