बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

कामशेत रेल्वे स्टेशन जवळ इंद्रायणी नदी मध्ये एका नागरिकाला  वाचविण्यात यश….

मावळ मध्ये दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे   आणि अशा मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांनी उग्र रूप धारण केले आहे, अशा वेळी कामशेत मधील इंद्रायणी नदी मध्ये रेल्वे स्टेशन येथे घाटावर ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे यांचा जुना पंप याच्या मागील बाजूने रात्री 8:30 वाजता इंद्रायणी नदीमध्ये एक नागरिक किनाऱ्याच्या कथाडाला पकडून थांबलेला होता. 

राजेश ढगे, अभिमन्यू शिंदे, तसेच कामशेत मधील नागरिक आणि कामशेत पोलिसांनी वाचवला एका व्येक्तीचा जीव

त्या नागरिकांने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जोराने वाचावा वाचावा असा आवाज मारला आणि तो आवाज राजेश ढगे यांना ऐकायला आला, त्यांनी जवळ जाऊन पाहिले की पंपाच्या मागे इंद्रायणी नदीमध्ये पाण्यात एक माणूस कठाड्याला धरून उभा आहे तो जोराने आवाज देत आहे, लगेच त्यांनी कामशेत पोलीस स्टेशन व अभिमन्यू शिंदे यांना फोन केला,थोड्या वेळात तेथे अभिमन्यू शिंदे आणि पोलीस तसेच  कामशेत मधील रोशन शिंदे, बंटी शिंनगारे, संदेश पायगुडे, आणि इतर नागरिकांनी येऊन त्याला पाण्यातून बाहेर काढून त्या नागरिकाचा जीव वाचवला.

यावेळी पोलीस कॉन्स्टेबल निंबाळकर साहेब व पोलीस बांधावांचे मोठे सहकार्य मिळाले…. 

Share it :