बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

पवना धरणातून विसर्ग कमी; पूल वाहतूकीसाठी मोकळे.

पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासनाने घेतला निर्णय. नदीकाठाच्या नागरिकांना दिलासा.

पवनानगर : राज्यात सलग तिसऱ्या

दिवशी पावसाची उघडीप झाली असून, पवना धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पवना नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने पवनमावळ भागातील कोथुर्णे, ब्राम्हणोली आणि कडधे येथील पूल वाहतुकीसाठी मोकळे झाले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा

पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासनाने घेतला निर्णय. नदीकाठाच्या नागरिकांना दिलासा.

जोर वाढल्यामुळे पवना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. मात्र, बुधवारी (दि.२०) सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणारे पाणी कमी झाले. त्यामुळे बुधवार (२० ऑगस्ट) सकाळी साडे दहानंतर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला.

१९ ऑगस्ट रोजी पवना धरणातून १५,७७० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. यामुळे कोथुर्णे, ब्राम्हणोली, कडधे या भागांतील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाले होते. परंतु आत्ता सर्व पूल वाहतूकीसाठी मोकळे झाले आहेत.

Share it :