गुरुवार , २१ ऑगस्ट २०२५ | 📍तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये बचत गटांना कर्ज वाटप.

केंद्रशासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत पंडित दीनदयाळ अंत्योदय योजनेमार्फत तळेगाव शहरातील महिला बचत गटांना कर्जवाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत तळेगाव शहरातील ७ बचत गटांना व्यावसायिक कर्ज एकूण रु. २६,५०,००० बीज भांडवल निधीचा धनादेश वितरित करण्यात आला. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील महिलांना अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन देऊन त्यांना सक्षम करण्याचा मुख्य हेतू आहे .
यापूर्वीही तळेगाव शहरातील ३ महिला बचत गटांना रु. ४,२०,००० निधी वितरित करण्यात आला होता. यावेळी तळेगाव शहरात डेंग्यू सर्वेक्षण करणाऱ्या महिलांना तळेगाव नगरपरिषदेच्या वतीने ड्रेस कोड आणि ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले.

या योजनेचा उद्देश:-
🔸महिलांना स्वावलंबी बनवणे
🔸लघु उद्योजकांना चालना देणे
🔸रोजगारनिर्मिती वाढवणे
🔸स्थानिक अन्नप्रक्रिया उद्योगांना बळकटी देणे
योजनेंतर्गत महिलांना उद्योग उभारणीसाठी आवश्यक आर्थिक मदत, प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी श्री. विजयकुमार जी सरनाईक उपस्थित होते. तसेच श्री. रमेशभाऊ साळवे , श्री. संतोष दाभाडे , श्री. मयूर ढोरे , श्री. नंदकुमार काळोखे , श्री. योगेश काळोखे , ममता राठोड , विभा वाणी यांचीही उपस्थिती लाभली.
या योजनेमुळे ग्रामीण महिला बचत गटांना नवे उद्योग उभारता येणार असून, त्यांचं उत्पन्न आणि आत्मविश्वास वाढीस चालना मिळणार आहे .