बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

खासदार सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदावरून हटवले; त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार…

बारामतीतील या संस्थेच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या  खासदार सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी होत्या.

‘या’ संस्थेबाबत घेतला निर्णय

बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे. राज्यातील बृहन्मुंबईतील तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांसाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे . बारामतीतील या संस्थेच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या  खासदार सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी होत्या. आता त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या पत्नी, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या संस्थेच्या सदस्यपदी ज्योती नवनाथ बल्लाळ, डॉ. कीर्ती सतीश पवार, डॉ. सचिन कोकणे, श्रीनिवास वायकर, डॉ. दिलीप लोंढे, अविनाश गोपने, बिरजू मांढरे यांची  नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारिणीवर खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याने चर्चेला उधाण आले आहे.

बारामती : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या संस्थेसाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यागत मंडळाच्या अध्यक्षपदावरून खासदार सुप्रिया सुळे यांना हटविण्यात आले असून, त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी, राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे

या समितीचा कालावधी दोन वर्षाचा राहील. परंतु दुसरी नवीन समिती स्थापन होईपर्यंत अस्तित्वात असलेल्या समितीचे सदस्य कार्यभार धारण करतील.

समितीची बैठक दोन महिन्यातून किमान एकदा तरी बोलविण्यात यावी. अध्यक्षांनी निर्देशित केल्यास, अधिक वेळा बैठक बोलविता येईल.

कोणीही सदस्य सतत दोन बैठकीत अनुपस्थित राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्य होईल, परंतु सदस्य योग्य व सबळ कारणांसाठी अनुपस्थित राहिला असल्यास सभासदस्यत्व पुढे चालू ठेवण्यास शासन अनुमती देईल.

समितीच्या प्रत्येका बैठकीची आगाऊ सूचना बैठकीच्या दिनांकापासून १० दिवस अगोदर बैठकीच्या कार्यसूचीसह समिती सदस्यांना पाठविण्यात यावी, तसेच संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना समितीच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहण्याचा हक्क राहील व त्या उपस्थितीच्यावेळी त्यांना समितीच्या सदस्यांचे हक्क व दर्जा प्राप्त असेल.

Share it :