बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा ( कुरवंडे, ता. मावळ ) येथे लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

🗓️ गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ | मंत्रालय, मुंबई

आज उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा ( कुरवंडे, ता. मावळ ) येथे लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये ग्लास स्काय वॉक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

मा. श्री. अजित दादा पवार यांच्या माध्यमातून नियोजन विभागाकडून ०५ फेब्रुवारी २०२४ रोजी या प्रकल्पासाठी ३३३ कोटींची मान्यता दिली आहे.

या बैठकीत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात प्राथमिक समन्वय, प्रस्तावित सुविधा, जागेची आवश्यकता, स्कायवॉकचे महत्त्व, अ‍ॅडव्हेंचर व अम्युझमेंट पार्क, पर्यटकांची सुरक्षा व निवास याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

🔸प्रकल्पा मधील प्रस्तावित अंतर्भुत सुविधा :-

  • भव्य प्रवेशद्वार, तिकीट घर, फूड कोर्ट, स्नॅक बार, वाहनतळ, कनिष्ठ समारंभ हॉल यांसारख्या सोयी. सायटसीईंग, झिप लाईन, बंजीजंपिंग, वॉल क्लायम्बिंग, फेरीस व्हील यांसारखे साहसी खेळ.
  • झुला, रेन डान्स, स्केटिंग, पाण्याची टाकी, CCTV कॅमेरे, ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना इत्यादी सुविधाचा समावेश आहे.

घेण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय

🔸 जागेची आवश्यकता :-
उपलब्ध जागेची कमतरता लक्षात घेऊन वनविभागाने अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी.

🔸 स्कायवॉकचे महत्त्व :-
स्थानिकांना स्कायवॉकचा अनुभव यावा यासाठी दरमहा ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्यात येईल.

🔸 अ‍ॅडव्हेंचर व अम्युझमेंट पार्क सोबत आणखी नावीन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करून पर्यटन सुविधा वाढवण्याबाबत दिले निर्देश

🔸 पर्यटकांची सुरक्षा व निवास:-

  • पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्थेवर भर.
  • निवासासाठी टेंटिंग सुविधा उभारण्याचा निर्णय
  • मावळ तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.

या ग्लासस्काय वॉक प्रकल्पामुळे रोजगारनिर्मिती वाढून ग्रामीण भाग समृद्ध होईल, असा विश्वास मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्येक्त केला आहे.

सदर बैठकीस  श्री. राजेश देशमुख ( उपमुख्यमंत्री यांचे सचिव), श्री. रमेश जालनापुर (मा. अध्यक्ष – रामोजी फिल्म सिटी), श्री. डुंडे (जिल्हाधिकारी – पुणे – V.C. वर), श्री. योगेश म्हसे (आयुक्त – PMRDA – V.C. वर), श्री. मंगेश वानखेडे (मु. का. अ. गार्डियन मीडिया), गणेश आप्पा ढोरे, विठ्ठलअण्णा शिंदे, साहेबराव कारके, दिपक हुलावळे इ. मान्यवर उपस्थित होते.

Share it :