आज दि. १८/०९/२०२५ ला जनसंवाद अभियानांतर्गत सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी या गावांना आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

या भेटीदरम्यान नागरिकांनी आपले प्रश्न, तक्रारी व विकासाशी निगडित अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या.
गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रमुख मागण्यांपैकी
– शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते तातडीने खुले करणे.
– घनकच-याचे व्यवसथापनाकरिता येणारी जागेची अडचण व घंटागाडीची मागणी
– इंदोरी ते जांबवडे रस्त्यावरील अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविणे
– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राहिलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी मागणी
– प्रस्तावित नवीन रेल्वे लाईनसंदर्भात शेतकऱ्यांची असलेली भूमिका
– रेशनिंग मिळणेबाबत असलेल्या संबंधित समस्या
– जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांतील अडचणी व वाढीव कामाची मागणी
– लाडकी बहीण योजना, संजय गांधी योजना यांसारख्या योजनांचे वंचित राहिलेले लाभार्थी यांची समस्या
– जातीचे दाखले व इतर शासकीय दाखल्यांबाबत येणाऱ्या अडचणी

ग्रामस्थांनी या सर्व समस्या केवळ तोंडी नव्हे तर लेखी स्वरूपातही सादर केल्या. नागरिकांकडून प्राप्त झालेले सर्व अर्ज स्वीकारण्यात आले असून, संबंधित विभागांमार्फत त्यावर तातडीने व योग्य ती कार्यवाही करून प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन आमदार सुनील शेळके यांच्याकडून देण्यात आले.