बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास

ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शिवाजी कर्डीले यांची प्राणज्योत मालवली
अहिल्यानगर :भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचं निधन झाल्याचं दुर्दैवी वृत्त समोर आलं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कर्डीले यांची प्राणज्योत मालवली. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होत.

कोण होते शिवाजीराव कर्डीले ?
शिवाजीराव कर्डीले २००९ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून उभे होते. त्यांनी ५७ हजार ३८० मतं मिळवून विजय संपादन केला होता. २०१४ मध्येही ९१ हजार ४५४ मतांनी विजय मिळवला होता.सुरुवातीला त्यांनी आपला दुधाचा व्यवसाय सुरू केला. काही काळ ते गावचे सरपंच राहिले होते. त्यानंतर अपक्ष म्हणून आमदारकीसाठी उभे राहिले आणि निवडूनही आले. जमिनीचे व्यवहार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा आणि हॉटेल उद्योग यामुळे त्यांचे नाव संपूर्ण जिल्ह्याभरात झाले. २०१४ च्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीमध्ये जाहीर सभा घेतली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागते.

Share it :