बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

ठाण्यात असं पहिल्यांदाच घडलं, मोर्चात मनसे, काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचे नेते एकत्र.

ठाण्यातील प्रचंड वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, अनधिकृत बांधकामे, भ्रष्ट अधिकारी, क्लस्टर योजनेचा उडालेला बोजवारा, शासन निधीतील अनागोंदी, वाढलेली गुन्हेगारी अशा विविध प्रश्नांवरुन ठाण्यात शिवसेना (उबाठा) आणि मनसेने सोमवारी ठाणे पालिका मुख्यालयावर भव्य धडक मोर्चा काढला. मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शप), काँग्रेसही सहभागी झाले होते. या संयुक्त मोर्चाद्वारे हल्लाबोल करीत विरोधकांनी ठाणे पालिका प्रशासनासह सत्ताधार्‍यांविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन […]

गरब्याच्या ठिकाणी गोळीबाराचा थरार; शिवसेना शाखाप्रमुखाला धमकी; पिता-पुत्राला अटक, पिस्तुल जप्त.

घटनेवेळी बालाजी मित्र मंडळ व शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्या पुढाकाराने गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोहम पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाला. उल्हासनगर : नवरात्रोत्सवाच्या आनंदमय वातावरणाला मंगळवारी रात्री दहशतीचे ग्रहण लागले. कॅम्प क्र. २ येथील बंजारा विकास परिषदेच्या परिसरात सुरू असलेल्या गरब्यादरम्यान, एका सराईत गुन्हेगाराने शिवसेना शाखाप्रमुखावर थेट बंदूक रोखत […]

लाथा-बुक्के अन् शिवीगाळ, त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडगिरी करत पत्रकारांना मारहाण, राज्यभरात संताप!

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात काही गुंड अनधिकृतपणे गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती वसूल करत होते. याच ठिकाणी काही पत्रकार साधू-महंतांच्या बैठकीच्या बातमीच्या वार्तांकनासाठी जात असताना काही गुंडांच्या टोळक्यांनी या पत्रकारांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत तीन ते चार पत्रकार जखमी झाले तर इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढारीचे पत्रकार […]

पुणे:सासऱ्याने सुनेला शारीरिक संबन्ध ठेवण्यासाठी बळजबरी केली.

पुणे : लैंगिक क्षमता नसलेल्या मुलाचे लग्न लावल्यानंतर सुनेला त्रास देऊन संततीसाठी सासऱ्याने सुनेला शारीरिक संबन्ध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तिच्या बेडरूममध्ये घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरा पोलीस दलामधून सेवानिवृत्त झालेला सहायक पोलीस आयुक्त (Retired ACP) आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी ३५ वर्षीय पती, […]

बीड : हॉटेलमध्ये घुसले अन् अविनाशवर सपासप वार करून संपवलं, बीडमध्ये सिनेस्टाईल मर्डर सीन

अविनाश देवकर हे दरबार हॉटेलमध्ये बसलेले होते. अचानक पाठीमागून येऊन अविनाश यांच्या डोक्यात अज्ञात आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. बीड: बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत चालली आहे. मारामारी, अपहरण आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. अशातच  बीडच्या अंबाजोगाई शहराजवळ हॉटेलमध्ये घुसून एका 35 वर्षीय तरुणावर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याचा धक्कादायक […]

नगरमध्ये मध्यरात्री मोठा कट, पहाटे घोडे पीर दर्ग्यावर जमावाचा हल्ला, पोलीस फौजफाटा तैनात

अहिल्यानगर : रविवारी पहाटे तीनच्या सुमारास नगरमध्ये काही समाजकंठकांनी सामाजिक शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या घोडे पीर दर्ग्याला काही समाजकंटकांनी पाडण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती […]

कोल्हापूरमध्ये रात्री दंगल; जाळपोळ, दगडफेक अन् गाड्यांची तोडफोड

कोल्हापूर: कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर कमानीजवळ शुक्रवारी रात्री दंगल उसळली. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या वर्धापनदिनाच्या फलक व साऊंड सिस्टमवरून वाद झाला होता. त्यातूनच दोन गटांमध्ये दगडफेक व जाळपोळ झाली. सिद्धार्थ नगर : कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर परिसरात असणाऱ्या चौकातील कमानी जवळ शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली आहे. सिद्धार्थ नगर कमानीजवळ असणाऱ्या चौकात सिद्धार्थ […]