बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

इंदापुरात राजकीय भूकंप, हर्षवर्धन पाटलांना तीन जिवलग सहकाऱ्यांचा रामराम, कोणत्या पक्षात जाणार?

हर्षवर्धन पाटील समर्थकांनी धक्का दिल्यानंतर इंदापूर तालुक्याचे राजकारण पूर्णपणे नव्या समीकरणांच्या दिशेने वळण्याची चिन्हं दिसत आहेत. इंदापूर : इंदापूर तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा आठवडा राजकीयदृष्ट्या अत्यंत धक्कादायक ठरत आहे. त्यांच्या गोटातील तीन जिवलग सहकारी आणि राजकीय शिलेदार माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, हर्षवर्धन मोटार वाहतूक संघाचे […]

भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांचं निधन, वयाच्या ६६ व्या वर्षी अखेरचा श्वास

ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शिवाजी कर्डीले यांची प्राणज्योत मालवलीअहिल्यानगर :भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवाजी भानुदास कर्डीले यांचं निधन झाल्याचं दुर्दैवी वृत्त समोर आलं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कर्डीले यांची प्राणज्योत मालवली. ते अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार होते. त्यांनी सहावेळा आमदारकी भूषवली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे […]

ठाण्यात असं पहिल्यांदाच घडलं, मोर्चात मनसे, काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांचे नेते एकत्र.

ठाण्यातील प्रचंड वाहतूक कोंडी, पाणी टंचाई, अनधिकृत बांधकामे, भ्रष्ट अधिकारी, क्लस्टर योजनेचा उडालेला बोजवारा, शासन निधीतील अनागोंदी, वाढलेली गुन्हेगारी अशा विविध प्रश्नांवरुन ठाण्यात शिवसेना (उबाठा) आणि मनसेने सोमवारी ठाणे पालिका मुख्यालयावर भव्य धडक मोर्चा काढला. मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शप), काँग्रेसही सहभागी झाले होते. या संयुक्त मोर्चाद्वारे हल्लाबोल करीत विरोधकांनी ठाणे पालिका प्रशासनासह सत्ताधार्‍यांविरोधात जोरदार शक्तिप्रदर्शन […]

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन तीव्र:

धाराशिवः आपल्या विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आज, शनिवारी, रौद्र रूप धारण केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या काही उपोषणकर्त्यांनी थेट झाडावर चढून आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडाली. दुसरीकडे, जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेला शासकीय कार्यक्रम आंदोलक महिलांनी उधळून लावत आमदार राणा पाटील यांना धारेवर धरले. शेतकरी नेते […]

टोलनाक्यावर वाहनचालकांना मोठा दिलासा! फास्टॅग नसेल तरी दुप्पट टोल भरावा लागणार नाही.

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. आता फास्टॅग नसेल तरी दुप्पट टोल टॅक्स (पथकर) भरावा लागणार नाही. 15 नोव्हेंबर 2025 पासून हा नियम लागू होणार आहे. सध्याच्या नियमानुसार FAST टॅग ऐवजी रोख किंवा UPI ने टोल भरणाऱ्या वाहनधाराकांना सद्या टोल रकमेच्या दुप्पट टोल द्यावा लागत आहे. मात्र, 15 नोव्हेंबरपासून […]

गरब्याच्या ठिकाणी गोळीबाराचा थरार; शिवसेना शाखाप्रमुखाला धमकी; पिता-पुत्राला अटक, पिस्तुल जप्त.

घटनेवेळी बालाजी मित्र मंडळ व शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्या पुढाकाराने गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोहम पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाला. उल्हासनगर : नवरात्रोत्सवाच्या आनंदमय वातावरणाला मंगळवारी रात्री दहशतीचे ग्रहण लागले. कॅम्प क्र. २ येथील बंजारा विकास परिषदेच्या परिसरात सुरू असलेल्या गरब्यादरम्यान, एका सराईत गुन्हेगाराने शिवसेना शाखाप्रमुखावर थेट बंदूक रोखत […]

दिल्लीतील 12 वीत शिकणाऱ्या विध्यार्थ्याने रु 250 खर्चात इन्व्हर्टर बल्ब बनवला.

उदय भाटियाची कहाणी ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. दिल्लीतील एक १२वीत शिकणारा विद्यार्थी असताना उदयने ग्रामीण भारतातील वीज कटाच्या समस्येकडे लक्ष दिले. त्याने बिचपुरी गाव, उत्तर प्रदेश येथे स्वयंसेवक म्हणून भेट दिली आणि तेथील मुलांना वीज नसल्यामुळे अभ्यासात किती अडचणी येतात हे पाहिले. या अनुभवाने त्याला ठाम ठरवून काहीतरी बदल घडवायचा प्रेरणा दिली. त्याने परत […]

लाथा-बुक्के अन् शिवीगाळ, त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडगिरी करत पत्रकारांना मारहाण, राज्यभरात संताप!

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर येथील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात काही गुंड अनधिकृतपणे गाड्यांच्या प्रवेशासाठी पावती वसूल करत होते. याच ठिकाणी काही पत्रकार साधू-महंतांच्या बैठकीच्या बातमीच्या वार्तांकनासाठी जात असताना काही गुंडांच्या टोळक्यांनी या पत्रकारांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत तीन ते चार पत्रकार जखमी झाले तर इलेक्ट्रॉनिक मीडिया पुढारीचे पत्रकार […]

आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद अभियानाला जनतेचा उत्स्फूर्त सहभाग!

आज दि. १८/०९/२०२५ ला जनसंवाद अभियानांतर्गत सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व इंदोरी या गावांना आमदार सुनील शेळके यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. या भेटीदरम्यान नागरिकांनी आपले प्रश्न, तक्रारी व विकासाशी निगडित अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या. गावकऱ्यांनी उपस्थित केलेल्या काही प्रमुख मागण्यांपैकी – शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते तातडीने खुले करणे.– ⁠घनकच-याचे व्यवसथापनाकरिता येणारी जागेची अडचण व घंटागाडीची […]

मोठी बातमी! पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या घर, कार्यालयांवर आयकर विभागाचा छापा

पुणे: पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवहायिकांच्या कार्यालयांसह त्यांच्या घरी आयकर विभागाने अचानक छापा (Income Tax Raid) टाकत कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवहायिकांच्या कार्यालयांसह त्यांच्या घरी आयकर विभागाने अचानक छापा (Income Tax Raid) टाकत कारवाई करण्यात आली आहे. […]