बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

टोलनाक्यावर वाहनचालकांना मोठा दिलासा! फास्टॅग नसेल तरी दुप्पट टोल भरावा लागणार नाही.

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. आता फास्टॅग नसेल तरी दुप्पट टोल टॅक्स (पथकर) भरावा लागणार नाही. 15 नोव्हेंबर 2025 पासून हा नियम लागू होणार आहे. सध्याच्या नियमानुसार FAST टॅग ऐवजी रोख किंवा UPI ने टोल भरणाऱ्या वाहनधाराकांना सद्या टोल रकमेच्या दुप्पट टोल द्यावा लागत आहे. मात्र, 15 नोव्हेंबरपासून […]

दिल्लीतील 12 वीत शिकणाऱ्या विध्यार्थ्याने रु 250 खर्चात इन्व्हर्टर बल्ब बनवला.

उदय भाटियाची कहाणी ही प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे. दिल्लीतील एक १२वीत शिकणारा विद्यार्थी असताना उदयने ग्रामीण भारतातील वीज कटाच्या समस्येकडे लक्ष दिले. त्याने बिचपुरी गाव, उत्तर प्रदेश येथे स्वयंसेवक म्हणून भेट दिली आणि तेथील मुलांना वीज नसल्यामुळे अभ्यासात किती अडचणी येतात हे पाहिले. या अनुभवाने त्याला ठाम ठरवून काहीतरी बदल घडवायचा प्रेरणा दिली. त्याने परत […]

पुण्यात 1500 एकर जागेवर आणखी एक मोठ नवीन IT पार्क उभारणार; जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कला पर्याय

महाराष्ट्र सरकारने पुरंदर तालुक्यात प्रस्तावित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लॉजिस्टिक्स हबजवळ एक नवीन आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील गर्दी कमी करणे आणि या प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी नवीन आयटी पार्क उभारले जाणार आहे. पुरंदर :पुण्यातील  हिंडवडी येथील IT पार्क हे भारतातील सर्वात मोठ्या IT पार्कपैकी एक आहे.  हिंडवडी […]

वैष्णोदेवी भूस्खलन : मृतांचा आकडा 41 वर,

माता वैष्णो देवीच्या मंदिरात झालेल्या अपघाताची बातमी ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. कारण देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.दररोजप्रमाणे, भाविक माता वैष्णो देवीचे दर्शन घेण्यासाठी चढत होते आणि ज्यांनी आधीच दर्शन घेतले होते ते परतत होते. जम्मूमध्ये तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत होता. यामुळं भूस्खलन (landslide )होण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी दुपारी 3 […]

तरुण तडफदार, उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातून अजून एक उमेदवार, राजकीय वर्तुळात खळबळ

एनडीए आणि इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातूनही एका तरुण तडफदार नेत्याने अर्ज भरला आहे. या अर्जामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरुण उमेश म्हेत्रे याने भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वत्र आश्चर्याचा धक्का दिला आहे. वयाने तरुण असलेल्या उमेशने नवी दिल्लीतील राज्यसभेच्या […]

तुमच्या फोनच्या कॉल आणि डायलरची सेटिंग अचानक बदलली? जाणून घ्या काय आहे कारण

तुमच्या फोनमधील कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलल्या आहेत का? जर होय, तर तुम्ही एकटे नाही आहात. बहुतेक अँड्रॉइड युजर्सच्या फोनमध्ये हा बदल झाला आहे. कॉलिंग इंटरफेसमध्ये झालेल्या या बदलामागचं कारण लोक जाणून घ्यायला उत्सुक आहेत. याबद्दल सोशल मीडियावरही लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. चला तर जाणून घेऊ या यामागचं खरं कारण काय आहे. Dialer […]

तुरुंगवासी PM-CM 31 व्या दिवशी पदावरुन हटवता येणार, शाहांनी मांडलेल्या तीन विधेयकांमध्ये नेमकं काय?

Lok Sabha Bills : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी – १३० वी घटनादुरुस्ती विधेयक २०२५, केंद्रशासित प्रदेश सरकार (सुधारणा) विधेयक २०२५ व जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (सुधारणा) विधेयक २०२५ अशी तीन विधेयके सादर केलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी १३० व्या घटनादुरूस्तीसह तीन महत्त्वाची विधेयके लोकसभेत बुधवारी सादर केली. या तिन्ही विधेयकांमधील पुढील […]

दौंड यवत परिसरात भीषण अपघात; दोन कारची धडक, दोघांचा जागीच मृत्यू तर 5 जखमी.

Accident News: लाल रंगाच्या स्विफ्टचा कारचालक पुणे-सोलापूर महामार्गावरून निष्काळजीपणे व नियमांचे उल्लंघन करून वेगाने जात होता, यावेळी त्याने उरुळीकडे जात असणाऱ्या स्विफ्ट डिझायर या गाडीला समोरासमोर धडक दिली.दौंड: पुणे सोलापूर  राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत दोन कारची भीषण धडक झाली. काल (बुधवारी, ता 20) रात्री झालेल्या या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. […]

पवना धरणातून विसर्ग कमी; पूल वाहतूकीसाठी मोकळे.

पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासनाने घेतला निर्णय. नदीकाठाच्या नागरिकांना दिलासा. पवनानगर : राज्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची उघडीप झाली असून, पवना धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे पवना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पवना नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागल्याने पवनमावळ भागातील कोथुर्णे, ब्राम्हणोली आणि कडधे येथील पूल वाहतुकीसाठी मोकळे झाले […]

कामशेत रेल्वे स्टेशन जवळ इंद्रायणी नदी मध्ये एका नागरिकाला  वाचविण्यात यश….

मावळ मध्ये दोन दिवस पावसाने धुमाकूळ घातला आहे   आणि अशा मुसळधार पावसामुळे सर्व नद्यांनी उग्र रूप धारण केले आहे, अशा वेळी कामशेत मधील इंद्रायणी नदी मध्ये रेल्वे स्टेशन येथे घाटावर ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे यांचा जुना पंप याच्या मागील बाजूने रात्री 8:30 वाजता इंद्रायणी नदीमध्ये एक नागरिक किनाऱ्याच्या कथाडाला पकडून थांबलेला होता.  त्या नागरिकांने स्वतःचा जीव […]