बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 7499103904 | 9764938981

पुण्यात 1500 एकर जागेवर आणखी एक मोठ नवीन IT पार्क उभारणार; जगप्रसिद्ध हिंजवडी IT पार्कला पर्याय

महाराष्ट्र सरकारने पुरंदर तालुक्यात प्रस्तावित पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि लॉजिस्टिक्स हबजवळ एक नवीन आयटी पार्क उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हिंजवडी आयटी पार्कमधील गर्दी कमी करणे आणि या प्रदेशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी नवीन आयटी पार्क उभारले जाणार आहे. पुरंदर :पुण्यातील  हिंडवडी येथील IT पार्क हे भारतातील सर्वात मोठ्या IT पार्कपैकी एक आहे.  हिंडवडी […]

उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा ( कुरवंडे, ता. मावळ ) येथे लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

🗓️ गुरुवार, ११ सप्टेंबर २०२५ | मंत्रालय, मुंबई आज उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा ( कुरवंडे, ता. मावळ ) येथे लायन्स व टायगर पॉईंट येथील ग्लास स्काय वॉक प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये ग्लास स्काय वॉक प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. मा. श्री. अजित दादा पवार यांच्या माध्यमातून नियोजन विभागाकडून […]

पुणे:सासऱ्याने सुनेला शारीरिक संबन्ध ठेवण्यासाठी बळजबरी केली.

पुणे : लैंगिक क्षमता नसलेल्या मुलाचे लग्न लावल्यानंतर सुनेला त्रास देऊन संततीसाठी सासऱ्याने सुनेला शारीरिक संबन्ध ठेवण्यासाठी बळजबरी केली. तिच्या बेडरूममध्ये घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरा पोलीस दलामधून सेवानिवृत्त झालेला सहायक पोलीस आयुक्त (Retired ACP) आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी ३५ वर्षीय पती, […]

सर्वात मोठी बातमी! ८ जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरूवात

मराठवाडा:मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली आहे. २ सप्टेंबर रोजी काढलेल्या हैद्राबाद गॅझेटिअरच्या जीआरनुसार ही प्रक्रिया सुरू झाली. मराठवाड्यातील ८,५५० पैकी १,५१६ गावांत कुणबी नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेला सुरुवात हैद्राबाद गॅझेटिअरच्या नोंदींवर आधारित तपासणी सुरू ८,५५० पैकी १,५१६ गावांत कुणबी नोंदी आढळल्या २,३८,५५९ प्रमाणपत्रांपैकी ८,२२७ प्रमाणपत्रे वैध ठरली मराठा […]

आव्हान स्वीकारत रोहित पवारांनी दिला बावनकुळेंना थेट पुरावाच!

टि्वट वॉर रंगले: भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात टि्वट वॉर रंगले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रोहित पवारांनी केलेल्या आरोपाला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत पुरावे द्या, अन्यथा राजकीय संन्यास घ्या, असे आवाहन केले होते. ते आव्हान स्वीकारत रोहित पवारांनी थेट पुरावाच दिला आहे. रोहीत पवार : […]

मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, सरकारला दिला इशारा;

मराठा आरक्षण : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पुन्हा आक्रमक झाले आहेत. ‘हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल.’, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आक्रमक झालेल्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे […]

खासदार सुप्रिया सुळे यांना अध्यक्षपदावरून हटवले; त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार…

बारामतीतील या संस्थेच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना झाली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या  खासदार सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी होत्या. ‘या’ संस्थेबाबत घेतला निर्णय बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात आले आहे. राज्यातील बृहन्मुंबईतील तसेच बृहन्मुंबई व्यतिरिक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयांसाठी अभ्यागत मंडळाची पुनर्रचना करण्यात आली आहे . बारामतीतील या संस्थेच्या अभ्यागत मंडळाची पुनर्रचना […]

सातारा गॅझेटमध्ये पुरावा मोठा; कुणब्यांचेच झाले मराठा

१८८१ च्या नोंदीनुसार स्पष्टता; जनगणनेतील आकडेवारी हाच आधार मुंबई : येथे झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सातारा गॅझेटवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर आणि सातारा गॅझेटवर एक महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सातारा गॅझेट म्हणजे नेमके आहे तरी काय? याविषयी चर्चा सुरू झाली आहे. याचे संदर्भ १८८१ पासून […]

मराठा आरक्षणानंतर ओबीसींसाठीही सरकारचं महत्वाचं पाऊल, उपसमिती गठीत; बावनकुळे अध्यक्ष, ‘हे’ बडे मंत्री असणार सदस्य

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समाजात नाराजी पसरल्याने, सरकार ओबीसींच्या विकासासाठी महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. चंद्रशेखर बावनकुळे या समितीचे अध्यक्ष असतील, तर छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्यासह आठ मंत्री सदस्य असतील. ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी ही समिती धोरण तयार करणार असल्याचे वृत्त आहे. मुंबई : मराठा आरक्षणासाठी नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासह […]

राजकारण महाराष्ट्राचे : एकनाथ शिंदेंना मोठा झटका, बड्या नेत्याने केला भाजपमध्ये प्रवेश

नंदुरबार : भाजपने शिंदे गटाला जोरदार धक्का दिला आहे. नंदुरबारमधील बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते संतोष पाटील यांनी पक्षाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.पाटील हे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय असून, स्थानिक राजकारणात त्यांचा मोठा प्रभाव मानला जातो.या प्रवेशामुळे नंदुरबारमध्ये शिवसेना शिंदे […]